AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल!
समाचारNews 18 lokmat
ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल!
➡️ भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. भारताने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत ब्रॉन्झ मेडल पटकावले. यापूर्वी भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानंतर चार दशकांनी टोकयोमध्ये मेडल जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ➡️ भारताची जर्मनीच्या विरुद्ध सुरुवात खराब झाली. जर्मनीनं पहिल्या क्वार्टरमध्ये गोल केला. त्यानंतर भारताने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीचं वर्चस्व होतं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीत सिंहनं गोल करत भारताला बरोबरीत आणले. ➡️ दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोलचा वर्षाव झाला. यामध्ये भारताकडून तीन तर जर्मनीकडून दोन गोल झाले. जर्मनीनं दोन मिनटामध्ये दोन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. ➡️ भारतीय टीमनं तीन मिनिटामध्येच दोन गोल केले. हार्दिक सिंहनंतर हरमनप्रीत सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या गोलमुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख