AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी उपाय!
🌱जास्त तापमान त्याचबरोबर झाडांना कमी फुटवा व कमी पाने असतील तर फळांचा आणि तीव्र सूर्यकिरणांचा संपर्क येऊन फळे खराब होतात अथवा फळांची गुणवत्ता ढासळते व अशा फळांना बाजारात भाव मिळत नाही. यावर उपाययोजना म्हणून फळ वाढी साठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांसोबतच झाडाच्या वाढीसाठी थोडासा नत्रयुक्त खतांचा वापर करावा जेणेकरून झाडावर फुटवा चांगला राहील व फळांची फुगवण देखील होईल. 🌱तसेच फवारणी साठी टी स्टेन चे ग्रीन मिरॅकल (अँटीट्रन्स्पिरंट/बाष्पीभवन रोधक) 2 मिली व मॅंकोझेब 75 % डब्लू पी घटक असलेले बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. यामुळे फळाची गुणवत्ता टिकवून राहील. 🌱संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
1
इतर लेख