AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आता,महिन्याला मिळवा 5 हजारांची पेन्शन!
समाचारTV9 Marathi
आता,महिन्याला मिळवा 5 हजारांची पेन्शन!
➡️ केंद्र सरकारकडून अनेक निवृत्तीवेतन योजना चालवल्या जातात. यापैकीच एक म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेत तुम्ही महिन्याला 210 रुपये गुंतवून म्हातारपणी दर महिन्याला पाच हजारांची पेन्शन मिळवू शकता. ➡️ तुम्ही वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला पेन्शन सुरु होईल. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीप्रमाणे 1000 ते 5000 रुपयांची पेन्शन दिली जाईल. 18 ते 40 वयोगटाच्या व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवू शकतात. ➡️ योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बँकेत बचत खाते, आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर या गोष्टी गरजेच्या आहेत. ➡️ या योजनेत तुम्ही किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पद्धतीने प्रीमिअम जमा करु शकता. ➡️ तुमच्या खात्यातून नियोजित तारखेला पैसे कापले जातील. म्हातारपणी तुम्हाला किती पेन्शन हवी यावर प्रीमियमचा हप्ता ठरेल. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 1.5 रुपयापर्यंतची करमाफी मिळेल. अटल पेन्शन खाते कसे सुरु कराल? * कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन स्कीमचे खाते सुरु करु शकता. * अटल पेन्शन योजनेचा फॉर्म ऑनलाईन डाऊनलोडही करता येईल. * हा फॉर्म तुमच्या नजीकच्या बँक शाखेत द्यावा लागेल. * या फॉर्मसोबत तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डाची छायांकित प्रत देणे गरजेचे आहे. * तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
14
इतर लेख