క్షమించండి, మీరు ఎంచుకున్న భాషలో ఈ ఆర్టికల్ అందుబాటులో లేదు.
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Mar 19, 07:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
कांदा अनुदानास मुदतवाढ
२८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यास मंजुरी मुंबई: राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील कांदा हे महत्त्वाचे नगदी पीक असून ते खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी अशा हंगामात घेतले जाते. खरीप आणि उशिराचा खरीप हंगामात उत्पादित होणारा कांदा रब्बीच्या तुलनेत जास्त दिवस टिकवून ठेवता येत नाही. सध्या उशिराचा खरीप व रब्बी हंगामातील कांद्याची राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे.
शेतकऱ्यांना फायदा व्हावा साठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाच्या निर्णयास मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आपल्या कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. हे अनुदान थेट बँक हस्तांतरणाद्धारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, ९ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0