AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
नोव्हेंबरमध्ये कापसाच्या किंमतीमध्ये होईन घट!
नवी दिल्ली – कापसाच्या वाढत्या किंमती आता, नोव्हेंबरमध्येच कमी होतील. देशातील अधिक राज्यांतील कांदयाच्या बाजारपेठेतील किंमती प्रति किलो ७० ते ८० रू. झाल्या आहेत. या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधून प्रति किलो २३.९० रू. या किंमतीमध्ये कांदयाची विक्री करत आहे. काही राज्य सरकारदेखील हे करत आहे. निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी सांगितले की, शासनाने ५० हजार टन बफर स्टॉकमधून १५ हजार टन कांदयाची विक्री केली आहे. त्याचबरोबर नोव्हेंबरच्या सुरूवातीला खरीपमध्ये नवे उत्पादन असलेला कांदा हा बाजारपेठेत आल्यानंतर, किंमती सामान्य स्तरवर येतील. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्टिट केले आहे की, बाजारात कांदयाचे उत्पादन वाढविण्यासाठी दोन संयुक्त सचिव स्तरच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. ते राज्यातील शेतकरी, व्यापारी व ट्रांसपोर्टवाल्यांशी चर्चा करून कांदयाच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेऊन, जास्तीत जास्त कांदा बाजारात आणण्यास सांगतिले जाईल. अन्य राज्यांनादेखील सांगण्यात आले की, ज्यांना जितके कांदा पाहिजे, त्यांनी सचिव, केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे मागणी करावी. या विभागाकडून त्वरित कांदाबाबत निर्णय दिला जाईल. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २६ सप्टेंबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
150
0