AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Dec 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
या सात राज्यात राबविणार ‘अटल भूजल’ योजना
नवी दिल्ली – लोकसहभागातून शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये ‘अटल भूजल’ योजना राबविण्यास मंगळवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. येत्या पाच वर्षात या योजनेची अंमलबजावणी होणार असून, त्याकरिता सहा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की भूजलाच्या माध्यमातून देशात ६५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते, तर ८६ टक्के पाण्याचा वापर हा पिण्याकरिता केला जातो. ही योजना गुजरात, हरियाना, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान व उत्तर प्रदेशात राबविण्यात येणार आहे.
या सात राज्यांतील ७८ जिल्हयांमधील सुमारे ८३५० ग्रामपंचायतींना या योजनेचा फायदा होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे या योजनेचा मुख्य हेतू आहे. भूजल व्यवस्थापनात लोकसहभाग वाढविणे, व्यापक स्वरूपात काटेकोर पाणी वापरण्यास प्रोत्साहन देणे, पीक पध्दतीचा विकास करणे, सामाजिक पातळीवर भूजलाचा काटेकोर व समान वापर करण्यासाठी नागरिकांच्या भूमिकेत बदल करण्याचा प्रयत्न करणे असे इतरदेखील हेतू आहेत. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
135
2