AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Dec 19, 01:00 PM
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
थेट शेतकऱ्यांकडून फळे व भाज्या खरेदी करेल ही कंपनी
पुणे - ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता थेट भारतातील शेतकऱ्यांकडून फळे, भाज्या व धान्य खरेदी करेल. पुणे येथे या कंपनीचा हा प्रकल्प सुरू आहे. ही कंपनी पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहे.
यासंदर्भात सुत्रांनी सांगितले की, ही कंपनी अन्न व किरकोळ व्यवसायाशी संबंधित असलेल्या अ‍ॅमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसमवेत काम करीत आहे. त्याचबरोबर उत्पादने अ‍ॅमेझॉन फ्रेश आणि अ‍ॅमेझॉन पॅन्ट्रीवर विकेल. हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास कंपनी हा व्यवसाय देशाच्या इतर भागातही वेगाने वाढवेल. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही शेतकरी व सरकारी संस्थांसमवेत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करून शेती ते थाळी हा मॉडेल विकसित करीत आहोत. संदर्भ – इकोनॉमिक टाईम्स, १८ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
296
4