AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
इजिप्तहून ६ हजार ९० टन कांदयाची होणार आयात
नवी दिल्ली: आज विविध राज्य सरकारांसमवेत केंद्रीय ग्राहक कार्य सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून प्रत्येक राज्यातील कांद्याच्या मागणीची पडताळणी केली. श्रीवास्तव यांनी याआधी २३ नोव्हेंबरला सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात एक पत्रही लिहिले आहे. एमएमटीसी या केंद्रीय संस्थेने इजिप्तमधून ६ हजार ९० टन कांदे आयातीची मागणी नोंदविली आहे.
हा कांदा न्हावा-शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरात येणार आहे. राज्य सरकारांनी हा कांदा ५२ ते ५५ रुपये प्रति किलो या दरांनी ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा यासाठी ही आयात केली जात आहे. या कांद्याची वाहतूक गरज भासल्यास नाफेडमार्फत केली जाणार आहे. प्रत्यक्षात आयातीत कांदे ग्राहकापर्यंत डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला पोहचतील. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २५ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
157
0