AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 May 19, 01:00 PM
कृषि वार्तापुढारी
इराण, इराक व सौदी अरबचे खजूर बाजारात
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यात खजूरला विशेष महत्व आहे. या सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत १०० टक्के खजूर दाखल झाला आहे. इराण, इराक व सौदी अरब येथून ५० हून अधिक प्रकारचा खजूर विक्रीसाठी बाजारात आला आहे. यामध्ये प्रतिकिलो ७० रूपयांपासून २ हजार रूपयांपर्यंत किंमतीच्या खजुराचा समावेश आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा खजुराच्या किंमतीमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतात खजुराचे फारसे पीक नाही. मात्र, रमजानसाठी परदेशातून खजुराची आवक होत असल्याचे व्यापारी दिनेश सेठ सांगतात. ते म्हणतात, सध्या इराणवरून बम, मझाफती, सौदी अरबवरून फर्ध, खलाझी, लुलू तसेच इराकमधून झहादी खजुराची मोठया प्रमाणात आवक होत आहे. बाजारात वेगवेगळया जातींचे खजूर उपलब्ध झाले आहेत. अज्वा जातीच्या खजुराला मोठया प्रमाणात मागणी आहे. कारण या खजुराचे झाड महमंद पैगंबर यांनी लावले आहे. हा खजूर मधामध्ये भिजवून त्यामध्ये केशर टाकून खाण्यास प्राधान्य दिले जाते. परदेशातील खजूर चवीला व आरोग्यदृष्टया फायदेशीर असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येते. संदर्भ – पुढारी, ७ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
0