AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Sep 19, 06:00 PM
मान्सून समाचारलोकमत
राज्यात पावसाची शक्यता
पुणे – कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या कोकणात सर्वदूर पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडयात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी 12 सप्टेंबरला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संदर्भ – लोकमत, 11 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
43
0