AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 May 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बांग्लादेशने तांदळावरचे आयात शुल्क ५५ टक्के केले
बांग्लादेश सरकारने तांदळाच्या आयातीवरील शुल्कमध्ये २७% वाढ करून ५५% केली आहे, याचा परिणाम भारतीय गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरदेखील होईल. वित्त वर्ष २०१८-२०१९ मध्ये भारतातून बांग्लादेशला गैर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये जवळपास ७६ टक्क्यांची घट झाली आहे.
बांग्लादेश सरकारच्या राष्ट्रीय राजस्व बोर्डद्वारा जाहीर केलेल्या माहितीनुसार, घरेलू शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी तांदळाच्या आयातीचे शुल्क वाढवून ५५ टक्के केले आहे. जे तत्काळ प्रभावशी लागू होईन. बांग्लादेशच्या तांदळाच्या आयातवर आतापर्यंत, २८ टक्के आयात शुल्क होता. एपीडाच्या एका वरिष्ठ अधिकारीनुसार, बांगलादेश हा देश भारतातून गैर-बासमती तांदळाची आयात अधिक करत होता. एवढेच नाही, तर २८ टक्के शुल्क झाल्यामुळे वित्त वर्ष २०१८-१९ मध्येदेखील बांग्लादेशच्या निर्यातीमध्ये ७६ टक्के घट आली होती. आयात शुल्कात वाढ झाल्याने निर्यातमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २४ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
28
0