कृषि वार्तालोकमत
कर्जमाफीसाठी लाभार्थींची पहिली यादी आज
मुंबई – राज्य शासनाच्या २ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार असून येत्या एप्रिलपर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जाहीर केले. पहिल्या यादीत प्रत्येक जिल्याच्या दोन गावांमधील लाभार्थींची नावे असतील. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होईल. आतापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांची नावे या योजनेसाठी आली आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून निकषात बसणाऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. सगळया शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संदर्भ – लोकमत, २४ फेब्रवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
29
0
संबंधित लेख