कृषी वार्ताकृषी जागरण
भारतात सर्वोत्कृष्ट केंद्र उभारणार
नवी दिल्ली: जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोन विकसित करुन त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने भारताने सर्वोत्कृष्ट केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, जमिनीचे वाळवंटीकरण आणि नापिकी रोखण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रांच्या उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडा येथे सुरु असलेल्या कॉप-14 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या संदर्भात प्रभावी योगदान देण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगभरात जमिनीच्या वाळवंटीकरणाचा दोन तृतीयांश देशांवर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन या आघाडीवर कृती करतानाच त्याच्या बरोबरीने पाणी टंचाईची दखल घेऊन त्यावरही कृती करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. पाणी पुरवठ्यात वृद्धीकरण, वाहून वाया जाणारे पाणी रोखणे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवणे हे जमिन आणि पाण्याच्या सर्वंकष धोरणाचे भाग आहेत. या संदर्भात युएनसीसीडीने जागतिक जलकृती कार्यक्रम तयार करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. संदर्भ – कृषी जागरण, 12 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
73
0
संबंधित लेख