AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 May 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस लागवडीपूर्वी गुलाबी बोंडे अळीचे व्यवस्थापन
मागील हंगामात ज्या क्षेत्रामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असेल, त्या शेतीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करून गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे. • जर आपल्या शेतीमध्ये अजूनही कापसाच्या काड्या असतील, तर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. • काड्याचे बारीक तुकडे करून त्यापासून जैविक खत तयार करावे. • कापसाच्या काड्यांचा इंधनासाठी वापर केला जातो. त्या ठिकाणी ढीग केला असेल तर तो प्लास्टिकने ढीग झाकून ठेवावा. • लवकर पक्व होणाऱ्या कापसाच्या वाणाची निवड करावी.
• वेळेवर कापसाची लागवड करावी. • कापसाच्या बीटी बियाणाबरोबर पाकीटमध्ये बिगर बीटी बियाणे येतात त्याची पेरणी शेतीभोवती करावी. • खतांचा व सिंचनाचा समतोल वापर करावा. • पिकांची फेरपालट नियमित करावी. त्याचबरोबर कापसामध्ये आंतरपीकचा अवलंब करावा. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
527
131