कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतकर्यांनी तेलबियांचे उत्पादन वाढवावे - सीतारमण
नवी दिल्ली, खाद्य तेलांमध्ये देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांना तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली येथे झालेल्या ग्रामीण आणि कृषी विषयावरील सहाव्या जागतिक कॉंग्रेसला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, आपल्याला मोठ्या प्रमाणात खाद्य तेले विशेषत: पाम तेल आयात करावे लागते. ग्रामीण जीवनावर आणि शेतीवर नेहमीपेक्षा अधिक अवलंबनाचा स्वीकार करतांना सरकार अनेक भागात लक्ष केंद्रित करत असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन आणि जलदाब बिंदू यावर त्यांनी भर दिला आणि शेतकर्यांना मृदा आरोग्य कार्ड दिले. अर्थमंत्र्यांनीही सौरऊर्जा क्षेत्रात शेतकऱ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, पवन ऊर्जा, छप्पर, पडीक जमिनीवरील सौर पॅनेल अशा क्षेत्रातही शेतकऱ्यांनी पुढे यावे, जेणेकरून शेतकरी अन्नदाता सोबतच ऊर्जावान देखील बनू शकतील. तसेच जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना सफरचंद, केशर, अक्रोड इत्यादी उत्पादनांना वाजवी दर मिळावेत जेणेकरून त्यांची उत्पादने देशभर पोहोचू शकतील. संदर्भ:- आउटलुक अॅग्रीकल्चर, १२-११-२०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
94
0
संबंधित लेख