AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Jan 19, 06:00 PM
कृषी वार्तालोकमत
जगातल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचे ज्ञान भावी पिढीला आवश्यक - पवार
नवी मुंबई - भविष्यात विज्ञानाच्या आधारे शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे. कारण,जेनेरिक फूडमुळे उत्पादन वाढले असून, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. जसे की, इंडोनेशियामध्ये देखील कमी पाण्यात ऊस उगवला जातो. अशा या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे यामुळे कृषी क्षेत्राची अधिक प्रगती होण्यास मदत होईल, म्हणूनच जगातल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचे ज्ञान भावी पिढीला दिले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी चौथ्या रयत विज्ञान परिषदेचे उद्घाटनावेळी मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन रयत शिक्षण संस्था आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
पालक म्हणून मुलांमध्ये वैज्ञानिक आस्था वाढेल यासाठी प्रयत्न करा. बुवाबाजी प्रवृत्तीला परावृत्त केलं पाहिजे असे ही यावेळी त्यांनी सांगतिले, तसेच विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ६० मुलांना मोफत शिक्षण रयत देत असून त्याची अंमलबजावणी सुरू झाला असल्याचा आनंद ही यावेळी त्यांनी व्यक्त केला. संदर्भ - लोकमत, २९ डिसेंबर २०१८
5
2