जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन
साधारणपणे हरभरा पिक फ़ुलोरा अवस्थेमध्ये वाढत असताना कोवळ्य़ा शेंड्यावर घाटेअळीचा आढळून येतो. फ़ांद्याची जोमदार वाढ, जलद होणारा फ़ुटवा तसेच कोवळ्या पानांची संख्या अधिक असणे ही घाटेअळीच्या अनुकुल प्रादुर्भावासाठीचे काही लक्षणे आहेत. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी अरासायनिक सेंद्रीय स्वरुपाचे उपाययोजना आहेत. उपाययोजना:- ह्या किडीच्या नियंत्रणासाठी पिकांची फ़ेरपालट होणे आवश्यक आहे. शेतात प्रती एकरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून हेलील्युर लावुन ठिकठिकाणी लावावेत.ल्युर लावताना हाताना कांदा लसून व सुंगंधी द्रव्य व उग्र पदार्थाचा वास नसावा. सापळ्यात प्रौढ पतंग अडकताना दिसु लागताच ५% निंबोळी अर्काची फ़वारणी घ्यावी. निंबोळी अर्का मध्ये स्टिकर चा वापर करावा जेणेकरुन सर्व कॅनोपिवर निंबोळी अर्क व्यवस्थीत पसरेल. कालावधीमध्ये शेतात प्रकाश सापळे एकरी १ या प्रमाणात लावल्यास त्यापासुन देखील प्रौढ आकर्षीत करुन नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल. पिकामध्ये "T" आकाराचे काठीचे कृत्रिम पक्षीथांबे एकरी २५-५० या प्रमाणात उभे करावेत. यामुळे पक्ष्यांना शेतात बसुन किडिंचे नैसर्गीक पध्दतीने नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात. घाटेअळी च्या जैविक नियंत्रणासाठी हेलिकोवर्पा अळीचा विषाणु अर्काची एच.ए.एन.पि.व्ही ची २५० एल.ई ची १०० मिली प्रति २०० ली या प्रमाणात फ़वारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
144
5
संबंधित लेख