AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Dec 19, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकिडे (थ्रिप्स) किडीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- सामान्यत: कापूस, मिरची, कांदा, लसूण आणि विविध फळ पिकांसाठी हि कीड हानिकारक आहे. काही प्रजाती व्हायरल रोगांचा प्रसार करतात.
जीवनचक्र:- अंडी:- मादी कीड पानांच्या ऊतीमध्ये सुमारे ५० ते ६० अंडी देते. अंड्याचा कालावधी साधारणतः ४ ते ९ दिवसांचा असतो. कीड:- फुलकिडे हे फिकट हिरव्या रंगाचे असतात. किडीच्या या अवस्थेचा कालावधी सुमारे ४ ते ६ दिवसांचा असतो. पतंग:- प्रौढांची लांबी १ ते २ मिमी असून तपकिरी / काळ्या रंगासह पिवळे असतात. प्रौढ कीड खूप सक्रिय असते. कोषावस्था:- प्रौढ कीड जमिनीमध्ये २.५ सें.मी. खोलीवर जाऊन कोषावस्थेत जाते. नियंत्रण:- • पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव आढळून येताच निम आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी. • अधिक प्रादुर्भाव झाल्यास ब्यूप्रोफेनझिन २५ एससी @२० मिली किंवा क्लोथिनिडिन ५० डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन ५० डब्ल्यूपी@१० ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ एससी @७ मिली किंवा सायनट्रेनिलिप्रोल १०.२६ ओडी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
153
1