AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्तापुढारी
शेतकऱ्यांसाठी लवकरच कॅशबॅक योजना
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना नवी भेट देण्याच्या तयारीत आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी, नवे अॅप विकसित करण्याचा प्रस्ताव सरकार करत आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कॅशबॅक योजना सुरू केली जाणार आहे. बाजार समिती अथवा स्थानिक मंडईमध्ये शेतकऱ्यांना भरावा लागणारा कर कॅशबॅकच्या रूपात परत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला हमीभाव मिळवून देण्यासह त्यांच्या उत्पादनांना चांगला फायदा मिळवून देण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक मदत व पेन्शन योजनाही सुरू केली आहे. आता. दलालांपासून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी नवे अॅप सुरू करणार आहे. स्थानिक मंडईमध्ये देण्यात येणारे शुल्क किंवा कर हा कॅशबॅकच्या माध्यमातून परत मिळवून दिला जाणार आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्याला देशातल्या सुमारे ५० हजार स्थानिक बाजार आणि मंडईंशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे एका क्लिकवर शेतकऱ्याला जवळपासची मंडई व हमीभावाची माहिती मिळू शकेल. संदर्भ – पुढारी, १८ जून २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
176
0