कृषि वार्तासकाळ
यंदा कापूस उत्पादन २५ टक्क्यांनी वाढणार
जळगाव – या जिल्हयात आतापर्यंत झालेल्या ११२ टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कपाशीचे उत्पादन भरघोस येणार आहे. कापूस उत्पादन २० ते २५ टक्के अधिक येऊन जिनिंग प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस येतील. शासनाने कपाशीला यंदा ५ हजार ५५० भाव जाहीर केला आहे. खासगी व्यापारी मात्र ४८०० ते ५२०० पर्यंत भाव देण्याची शक्यता आहे.
खानदेशात मुख्य पीक कपाशी आहे. नगदी पीक म्हणून बहुतांश शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात. गेल्या चार वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस अनियमित होता. यामुळे कपाशीचे उत्पादन मर्यादित राहिले. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा शेतकऱ्यांनी सात लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा केला. त्यात २५ टक्के अधिक उत्पादन अपेक्षित आहे. साधारणत दहा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान नवीन कापूस बाजारपेठेत येतो. यंदा अजूनही पाऊस सुरू आहे. आगामी काही दिवसांत पाऊस परत गेल्यानंतर कपाशी वेचणी सुरू होईल. यात सुमारे एक महिन्याचा कालावधी जाईल. यामुळे १ नोव्हेंबरला नवीन कपाशीचा हंगाम सुरू होईल, असे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीवर कपाशीचा भाव अवलंबून असतो. संदर्भ – सकाळ, २६ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
19
0
संबंधित लेख