टिप्पण्या (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
04 Jun 20, 11:54 AM

नमस्कार भोयर सर, आपल्या दोडके पिकामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसत असून बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड घटक असणारे प्रोन्टो @ 0.35 ग्रॅम/लिटर सोबत बुरशी नियंत्रणासाठी ​मॅंकोझेब घटक असणारे एम-45 @ 2 ग्रॅम/लिटर एकत्र करून फवारणीद्वारे द्यावे. तसेच ३ दिवसांनी आपल्या दोडका पिकामध्ये असलेल्या नागअळीच्या नियंत्रणासाठी आपण स्पिनोटेराम घटक असणारे डेलीगेट 180 मिली/एकर फवारणीद्वारे द्यावे. त्यानंतर ४ दिवसांनी आपल्या दोडके पिकावर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी, जास्त फायद्यासाठी अशीच फवारणी पीक वाढीच्या अवस्थेत दोनदा करणे योग्य राहील. भविष्यातही शेती, पिकांचे व पिकांच्या समस्यांचे फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा ज्याद्वारे आपल्याला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती देऊन आपल्या समस्यांवर योग्य सल्ला देण्याचा अॅग्री डॉक्टर प्रयत्न करतील. धन्यवाद.

0
0