सरजी पपई ला काय झालेले आहे. क्रुपया ईलाज कळवा लवकर......

4
0
2
0
टिप्पण्या (2)
jayesh kankhare
Kanalde, Jalgaon, Jalgaon, Maharashtra
03 Jun 20, 01:25 PM

कॉल करा 9172220117

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
04 Jun 20, 01:16 PM

नमस्कार रोकडे सर, आपल्या पपई पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव असून याचा प्रसार रसशोषणाऱ्या किडींमुळे होतो. त्यामुळे कीड नियंत्रित करणे गरजेचे आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोप्रिड घटक असणारे कॉन्फीडोर कीटकनाशक 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. त्यानंतर ३ दिवसांनी पिकावर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी. पपई किंवा इतर पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो असेच आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील . धन्यवाद!

0
0