सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कमी खर्चामधील शीतगृहाची उभारणी
कमी खर्चात शीतगृह उभारणी ही पद्धत पर्यावरणासाठी पूरक आहे. कोणतीही व्यक्ती कमी खर्चात याची उभारणी करू शकते.
शीतगृहाची वैशिष्टये: १ भाजीपाला व फळे साठवणुकीसाठी होतो. २. फळांमधील पौष्टिक मुल्य राखण्यास मदत होते. ३. यांत्रिकी किंवा विद्युत उर्जेची आवश्यकता लागत नाही. ४. फळे व भाजीपाला यांचा टिकाऊपणा वाढतो. ५. हे पर्यावरणपूरक व प्रदूषणविरहित शीतगृह आहे. ६. सर्वसाधारण व्यक्ती ही सहज हाताळू शकते. शीतगृह तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: १. वाळू २. विटा ३. बांबू ४. गोणी ५. स्ट्रो शीतगृह तयार करण्याची पद्धत: १. प्रथम खाली विटांचे तळघर बनवा. २. भिंतींची ७.५ सेमीची रुंदी असलेल्या ७० सेमी उंच दुहेरी भिंतीची रचना करा. ३. कमी किंमतीच्या चेंबरसाठी बांबू, पेंढा आणि वाळलेल्या चाऱ्याचे कव्हर फ्रेम बनवा. अन्यथा, लाकडाचे आच्छादन करा. ४. शीतगृहाच्या छतावर छप्पर घालणे आवश्यक आहे. शीतगृह वापरण्याची पध्दत: १. शीतगृह थंड ठेवावे. २. शीतगृहाभोवती सकाळ व सायंकाळ पाणी शिंपडावे. ३. फळे आणि भाज्या क्रेट्समध्ये साठवल्या पाहिजेत. शीतगृहाची घ्यावयाची काळजी : १. साठवलेल्या उत्पादनांवर पाण्याचे थेंब साचू देऊ नये. कारण ते बुरशी रोगास आमंत्रण देऊ शकतात. २. नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ३. वापरलेल्या वाळू व माती ही जैविक घटकांपासून मुक्त ठेवावे. ४. शीतगृहाच्या उपचारासाठी शिफारस केलेले कीटकनाशक व बुरशीनाशक वापरावे. ५.शीतगृहामध्ये कीटकनाशकाची ट्रीटमेंट केल्यास त्यामध्ये काही काळ फळे व भाजीपाला ठेवू नये. संदर्भ – आयएमओटी अॅग्री फाॅर्म लिंकदेन स्लाइड शेअर – गरीमा टी. (विदयार्थी, जीबी पंत विदयापीठ, उत्तराखंड) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
273
0
संबंधित लेख