AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्तालोकमत
तरूण शेतकऱ्यांना व्यवसायासाठी शासन देणार ३.७५ लाख रू.
नवी दिल्ली – मोदी सरकारनं ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं मृदा आरोग्य कार्ड योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील तरूण शेतकरी ज्यांचं वय १८ ते ४० वर्ष आहे, ते ग्रामीण स्तरावर मृदा परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना करू शकतात. प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी ५ लाख रू. खर्च येतो, ज्यातील ७५ टक्के म्हणजे ३.७५ लाख रू. मोदी सरकार देणार आहे.
मृदा कार्ड आरोग्य कार्ड योजना या योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता गट, कृष्ण सरकारी समिती, कृषक गट किंवा कृषक उत्पादक संघटनेनं या प्रयोगशाळेची स्थापना केल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारव्दारे मातीचा नमुना घेणे, परिक्षण करणं व मृदा आरोग्य कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ३०० प्रतिनमुना प्रदान करण्यात येणार आहे. लॅब बनविण्यासाठी सामान्य तरूण किंवा इतर संघटनांचे उपसंचालक, संयुक्त संचालक किंवा त्यांच्या कार्यालयाला प्रस्ताव देता येणार आहे. मातीच्या नमुन्याच्या प्रयोगशाळेची दोन पध्दतीनं सुरूवात करता येते. प्रयोगशाळा एक दुकान भाडयानं घेऊन त्यात सुरू करता येईल. दुसऱ्या पध्दतीत प्रयोगशाळा फिरती असते, की ती कुठेही घेऊन जाता येणार आहे, त्याला Mobile soil testing van म्हटले जाते. यासाठी ६.१२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३७ हजार कोटी टाकले जाणार आहे. संदर्भ – लोकमत, १९ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
1469
37