पशुपालनपशुसंवर्धन विज्ञान केंद्र, आनंद कृषी विद्यापीठ
जनावरांची गर्भावस्थेत असताना घ्यावयाची काळजी
स्वस्थ जनावरांसाठी १३ ते १४ महिन्यांमध्ये एक वेत होणे गरजेचे आहे. ३ ते ४ वेतानंतर ४ महिन्यांमध्ये जनावर पुन्हा माजावर येणे महत्वाचे आहे. गर्भावस्थेत असताना शेवटच्या ३ महिन्यात घ्यावयाची काळजी 1. गाभण जनावरांना पाण्यामध्ये जास्त वेळ बसू देऊ नका, तसेच जास्त कच्च्या रस्त्यावर जनावरांना चालू देऊ नये. डोंगराळ भागात जनावरांना चरायला जाऊ देऊ नये. 2. गाभण जनावरांना पोटफुगी होईल असे आहार देऊ नये. 3. विण्याच्या वेळेस जनावरांचे अंग बाहेर येऊ नये, म्हणून जनावरांचे तोंड उताराच्या दिशेने असावे. 4. नेहमी जनावर विण्याच्या वेळेस पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
5. जनावर गर्भावस्थेत असताना त्यांचे पालन पोषण करण्यासाठी योग्य खुराक दयावे. जसे की, हिरवा चारा, वाळलेला चारा, भुसा, पेंड, खनिज मिश्रण योग्य वाढीसाठी योग्य प्रमाणात द्यावीत. संदर्भ – पशुसंवर्धन विज्ञान केंद्र, आनंद कृषी विद्यापीठ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
764
0
संबंधित लेख