AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jul 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसामधील पांढरी माशीचे नियंत्रण
ज्या भागात पाणी साठवून राहते आणि नत्र खतांचा अतिरिक्त वापर होतो त्यावेळी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पावसाळ्याच्या वातावरणात अचानकपणे उघडीप होण्याच्या या वातावरणात या किडींची जास्त वाढ होते. रुंद व लांब पानाचे ऊसाचे वाण या किडींना संवेदनशील असते. या माशीच्या प्रादुर्भावामुळे ऊसामध्ये साखरेचे प्रमाणात घट होते. जर ८०% ऊसाच्या पानावर प्रादुर्भाव झाला असेल, तर २३.४% ऊस उत्पादनात घट होते. त्याचबरोबर २.९% सुक्रोजमध्येदेखील घट येते. ऊसामधील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय करावे. • ज्या भागात कायम पाणी साचून राहते, त्या भागात उसाची लागवड करू नये. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची सुविधा करावी. • पांढरी माशीचे प्रमाण हे सहसा क्षारपड जमिनीमध्ये जास्त असते. • जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल, तर ऊसाचा खोडवा घेणे टाळावे. • शिफारस केल्याप्रमाणे स्फुरद व नत्राची मात्रा द्यावी. • रासायनिक कीटकनाशकची फवारणी शक्यतो टाळावी. त्याऐवजी मित्र कीटक ऊसाच्या शेतीमध्ये सोडावे. • जर प्रादुर्भाव जास्त असेल तर अॅसिफेट ७५ एस पी @ १० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० इसी@२० मिली किंवा क्विनोलफोस २५ इसी@२० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
129
8