आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पिकात मल्चिंग पेपर चा वापर करताना
थंडी मध्ये (कमी तापमानात) मल्चिंग पेपर ची काळ्या रंगाची बाजू वरच्या दिशेने करावी जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यकिरण आकर्षित करून जमिनीत उष्णता निर्माण होईल व पिकाची थंडीत जोमदार वाढ होईल. उन्हाळ्यात सफेद अथवा चंदेरी रंगाची बाजू वरच्या दिशेने करावी जेणेकरून सूर्यकिरण परावर्तित होऊन जास्त उष्णतेने पिकास हानी होणार नाही तसेच चंदेरी रंगामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन कीड नियंत्रणास पण मदत होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
104
0
संबंधित लेख