आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
चालू हंगामात कापूस लागवडसाठी चांगले वाण कोणते आहे?
कापूस लागवड करण्यापूर्वी, कापूस बियाण्यांचे योग्य वाण हे माती, सिंचन सुविधा, हवामान व शेवटच्या हंगामात लागवड केलेल्या पिकांच्या अनुभवाच्या आधारे निवडावे. कापसाचे तीन प्रकारचे वाण: १.लवकर पक्व २.मध्यम पक्व ३. उशिरा पक्व १. आपल्याकडे पाण्याची उपलब्धता नसेल आणि जमीनची सुपीकता कमी असेल, तर लवकर पक्व होणाऱ्या वाणाची लागवड करावी. २.जर आपल्याकडे कमी पाण्याची उपलब्धता असेल. जसे की, कालवा किंवा विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असाल, तर मध्यम पक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी. ३.जर आपल्याकडे सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता असेल, तर उशिरा पक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी. ४. जर थंडीमध्ये तुम्हाला गहू किंवा इतर पिके घ्यायची असेल, तर मध्यम पक्व होणाऱ्या वाणाची निवड तुमच्यासाठी योग्य राहील. ५.हवामानावर आधारित वाणाची निवड करावी. ६.वेळेवर पेरणी करावी.
आजच आपल्यासाठी कोणते कापसाचे वाण योग्य आहे. त्याचबरोबर कापसाच्या विविध प्रकारच्या वाणांच्या बियाण्यांची लागवड करण्याच्या तारखा जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर'शी संपर्क साधा. फक्त १८०० १२० ३२३२ वर मिस कॉल द्या, लवकरच अ‍ॅग्री डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी संपर्क साधतील. कापसू शेतकऱ्यांसोबत ही महत्वाची माहिती शेयर करण्यास विसरू नका आणि यंदा योग्य वाण निवडा अन् अधिक उत्पन्न मिळवा. जय किसान!
284
0
संबंधित लेख