कृषि वार्तादैनिक भास्कर
यंदा आंब्याच्या उत्पादनात होणार घट
यंदा बाजारपेठेत मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आंबे आले आहेत. देशातील सर्वात मोठे आंबा उत्पादक असलेले राज्य उत्तर प्रदेशमध्ये आंब्याचे पीक मागील वर्षाच्या तुलनेत ४५ ते ५०% कमी झाले आहे. यासोबतच आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील पीक अपेक्षेप्रमाणे आले नाही. देशातील आंबा उत्पादक आणि व्यापारी यांची सर्वात मोठी संस्था भारतीय मँगो ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष इशाराम अली सांगतात की, देशात मागील वर्षी सुमारे २ कोटी टनपर्यंत आंब्याचे उत्पादन झाले होते. मात्र यंदा हे उत्पादन १.३१ करोड टन होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच उत्तर प्रदेशच्या आंबा उत्पादक असलेल्या प्रमुख क्षेत्रामध्ये वादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा अंदाज होता की, उत्तर प्रदेशमध्ये आंबा उत्पादन ३० लाख टनपर्यंत होईन, परंतु वादळामुळे हे उत्पादन २० ते २२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. संदर्भ - दैनिक भास्कर, २ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
36
0
संबंधित लेख