कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
जलाशयामध्ये पाण्याची कमतरता हे चिंताजनक
देशातील काही राज्यांच्या जलाशयातील पाणी हे मागील दहा वर्षांच्या सरासरी पातळीपेक्षाही खाली गेली आहे ही चिंताजनक बाब आहे. केंद्रीय जल संसाधन मंत्रालयानुसार, १७ जानेवारी २०१९ मध्ये पश्चिम क्षेत्रातील गुजरात आणि महाराष्ट्रातील २७ जलाशयात पाणी पातळी कमी होऊन ३७ टक्के राहिला आहे. जे की सरासरी अंदाजापेक्षा मागील दहा वर्षांच्या तुलनेत ५२ टक्के कमी आहे. ही परिस्थिती पूर्व क्षेत्रातील झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यात १५ जलाशयामध्ये आहे. या जलाशयांमध्ये पाणी पातळी कमी होत असून त्यांची एकूण साठवण क्षमता ६१ टक्के इतकी झाली आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीत या जलसाठामध्ये जल पातळी ६९ टक्के होती. याप्रमाणे दक्षिण भारतातील राज्ये आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या ३१ जलाशयात पाणी पातळी दहा वर्षांच्या सरासरी पातळीपेक्षा खाली आली आहे.
मध्य क्षेत्राचे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांच्या जलाशयातील पाण्याचा स्तर त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ५२ टक्के इतके आहे, जे मागील दहा वर्ष सरासरी वर्षाच्या ५२ टक्क्यांच्या बरोबर आहे. देशाच्या उत्तर क्षेत्रातील जलाशयातील पाण्याची स्थिती ठीक आहे. हिमाचल, पंजाब आणि राजस्थानतील ६ जलशांमध्ये पाणी पातळी ६२ टक्के आहे. जे मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा ४८ टक्क्यांनी जास्त आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १९ जानेवारी २०१९
5
0
संबंधित लेख