AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Jan 19, 07:00 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गांडूळ खताचे महत्व
उसाचे पाचाट, भाज्या, शेतातील कचरा इ. एकत्र करून 1.5 मी. रुंद, 0.9 मी. उंच असा गादीवाफा तयार करावा. प्रत्येक घनमीटरसाठी 350 याप्रमाणे पूर्ण वाढ झालेली गांडुळे गादीवाफ्यात सोडावीत. आर्द्रता 40 ते 50% ठेवावी व 20 ते 30 सें. तापमान ठेवावे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून बांबू व लाकडाच्या साहाय्याने मांडव घालावे. वाफ्यावर बारदानचे किंवा गवताचे आच्छादन द्यावे व दिवसातून हिवाळ्यात एक वेळ व उन्हाळ्यात दोन वेळा पाणी शिंपडावे. गादीवाफ्यात टाकलेला केरकचरा गांडुळे खातात. सर्व कचरा खाऊन गांडूळे तळाशी जातात. काळ्या रंगाचे खत तयार झाल्यानंतर त्यामध्ये 1 टन गांडूळखतामध्ये 1 लिटर पोट्याश मोबिलायझर कल्चर मिसळावे. पुढील 3 ते 4 दिवस पाणी शिंपडू नये. प्रकाशात गांडुळे राहत नसल्यामुळे ती गादीवाफ्याच्या तळाशी जातात. हेक्टरी सर्वसाधारणपणे 5-6 टन गांडूळखत हे सर्व पिकांसाठी वापरता येते.
गांडूळखताचा फायदा - 1. सर्व प्रकारच्या जमिनीसाठी वापरता येते. 2. गांडूळखत हे पिकांसाठी चांगले परिणामकारक व प्रभावशाली आहे. 3. हे पिकाला सर्व प्रकारचे अन्नघटक योग्य त्याप्रमाणात उपलब्ध करून द्यायला मदत करते. 4. जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता वाढवते. 5. गांडूळखत पिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. 6. कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत करते. 7. पिकांची उत्पादकता वाढविणे व तसेच त्यांचा रंग, चव, स्वाद, चकाकी सुधारूण उत्पादनात वाढ करते. 8. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होण्यास मदत करते. 9. गांडूळ खतामध्ये नत्राचे प्रमाण पाच पटीने स्फुरदाचे प्रमाण सात पटीने व पालाशचे प्रमाण अकरा पटीने जमिनीच्या तुलनेत जास्त असते. संदर्भ - अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
139
41