कृषी वार्ताकृषी जागरण
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रित कार्य करणे महत्वाचे - उपराष्ट्रपती
नवी दिल्ली: देशातल्या कृषी क्षेत्रातल्या समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक संबंधित व्यक्तीने एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याची भावना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विजयवाडा येथे शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्या संवादात्मक मेळाव्यात व्यक्त केली. नायडू म्हणाले, शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ग्रामीण रस्ते संपर्क सुधारणा, अधिक गोदामांची उभारणी, शीतगृहांची सुविधा, पाणी आणि वीजेचा निश्चित पुरवठा यांसारखा पायाभूत विकास करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेवर पतपुरवठा करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
पिकांमधे विविधता व कृषीपूरक जोडधंदा हाती घेणे याबाबत शेतकऱ्याला शिक्षण देण्याची गरज आहे. देशात व जगातील इतर भागातही कृषी क्षेत्राला मोठे प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्राशी निगडित अनेक मुद्यासंदर्भात एकत्रित आणि समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचेदेखील नायडू यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – कृषी जागरण, १८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
56
0
संबंधित लेख