कृषी वार्ताकृषी जागरण
शेतकरी अन्नदाता असून, त्यांचा सन्मान होण्याची आवश्यकता - उपराष्ट्रपती
पुणे: शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्राला मजबूत करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान गावा-गावात पोहचविण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांचे उत्पन्न ही वाढेल,असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेच्या पदवीप्रदानच्या उद्घाटनप्रसंगी मांडले.
नायडू म्हणाले, अनियमित मान्सून, बाजारभावांची अनिश्चितता,नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषीमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता आहे. शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असून त्याचा सन्मान होण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायमस्वरूपी धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. संदर्भ – कृषी जागरण, २६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
69
0
संबंधित लेख