AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Nov 19, 06:30 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गांडूळ खत तयार झाल्यास 'अशी' तपासणी करावी
पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता, पिकास निव्वळ रासायनिक खते न देता, त्यासोबत आपल्या शेतीमध्ये तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही एक काळाची गरज आहे. त्यामुळे आपण कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि शेणखत यांचा पिकासाठी जास्तीत जास्त वापर करावा. • सर्व पाचटापासून अंडाकृती लहान गोळ्या झाल्याचे दिसून येते. • गांडूळ खताचा सामू ७ च्या दरम्यान असतो. • गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीच्या वासासारखा येतो. • खताचा रंग गर्द काळा असतो. • कार्बन : नायट्रोजन गुणोत्तर १५ - २०.१ असे असते. गांडूळ खतामधील अन्नद्रव्याचे प्रमाण हे गांडुळाच्या खाद्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थानुसार बदलते. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या अन्नघटकाचे प्रमाण हे शेणखतामधील अन्नद्रव्यांपेक्षा जवळपास दुप्पट असते. सर्वसाधारणपणे पाचटापासून तयार केलेल्या गांडूळ खतामध्ये नत्र १.८५ टक्के, स्फुरद ०.६५ टक्के, पालाश १.३० टक्के व सेंद्रिय कर्ब ३५ ते ४२ टक्के असते. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणदेखील शेणखतापेक्षा जास्त असते. त्यामुळे पाचटापासून तयार केलेले गांडूळखत हे ऊस पिकास उत्कृष्ट सेंद्रिय खत असून एक हेक्टर क्षेत्रासाठी ५ टन गांडूळ खत लागणीच्यावेळी सरीमध्ये चळी घेऊन मातीमध्ये झाकून द्यावे. गांडुळखताचे फायदे • जमिनीचा पोत सुधारतो. • मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. • गांडूळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. • जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. • जमिनीची धूप कमी होते. • बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. • जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. • गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतिची बनवितात. • गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरमसाठ वाढ होते. • ओला कचरा व्यवस्थापन ही होते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
233
2