जैविक शेतीकृषि जीवन
शेतीमध्ये 'हायड्रोजेल'चा वापर आणि त्याचे फायदे
वातावरणामध्ये झालेल्या चढउतारामुळे विविध भागात पाऊस अनियमित आहे आणि दोन पावसादरम्यानचा वेळही वाढत आहे. पावसाअभावी शेतीच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेले हायड्रोजेल अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वरदान ठरू शकते. काय आहे हे ‘हायड्रोजेल’? ‘हायड्रोजेल’ म्हणजे मराठी भाषेत जलधनिका किंवा जलयुक्त जेल. हे जेल म्हणजे चवविरहीत, वासविरहीत, बिनविषारी, रांगोळीसारखी पावडर. स्वतःच्या वजनापेक्षा २५० ते १५०० पट पाणी पकडून ठेवण्याची या पावडरची क्षमता असते. रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केलेला हा पांढर्‍या दाण्यासारखा पदार्थ आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर, ते जेलमध्ये रूपांतरित होते आणि त्याचे वजन ३५०-५५० पट वाढून ते रोपाच्या मुळाशी चिकटते व आवश्यकतेनुसार पिकास ओल पुरविते. हायड्रोजेलचा मातीच्या सुपीकतेचा कोणताही प्रतिकूल परिणाम नाही. हायड्रोजेलचे फायदे:- - बियांची उगवण व मुळांची वाढ जास्त जोमाने होते. - पिकास ४०-६०% पर्यंत पाणी आणि पोषक अन्न्यद्रव्ये उपलब्ध करून देते. - जमिनीची जलधारण क्षमता वाढवते. तसेच, जमिनीतून होणारे बाष्पीभवन कमी करते. - जमिनीत हवा खेळती ठेवून जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारवते, जमीन भूसभूसित ठेवते. - पिकाच्या मुळांची वाढ करून बुरशी व मुळकुजीपासून मुळांचे संरक्षण करते. - जमिनीची पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे तसेच हवेमुळे होणारी धूप कमी करते. तसेच पावसाचे पाणी धरून ठेवते. - जमिनीचे वातावरण दीर्घकाळासाठी अवर्षणमुक्त करते. परिणामी, पिकांची पाण्यावाचून होणारी मर थांबते. दुष्काळी परिस्थितीं उद्भवली असता, पाण्याचा ताण पडला असतानाही पिक वाचते.
हायड्रोजेलचा वापरण्याच्या पद्धती:- - जमिनीत पेरणीच्या वेळी १ किलो हायड्रोजेल प्रति एकरी बियाण्यासोबत देण्याची शिफारस केली जाते. रेताड जमीन असल्यास त्याचे प्रमाण २.५ किलो प्रति एकर आहे. - किंवा चांगल्या परिणामासाठी १ किलो हायड्रोजेल आणि १० किलो माती एकत्र करून बियाण्यासह लागवड करावी . संदर्भ:- कृषि जीवन हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
638
6
संबंधित लेख