AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Dec 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकाचे संरक्षण, गुणवत्तेसाठी क्रॉप व फ्रुट कव्हरचा वापर आवश्यक
पिकामध्ये बऱ्याचवेळा एखाद्या रोगामुळे किंवा हवामानातील बदलामुळे फळांवर डाग आढळून येतात. क्रॉप कव्हर सुधारित तंत्रज्ञान उपयोगात आणले, तर शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो. ‘क्रॉप कव्हर’ किंवा ‘फ्रुट कव्हर’ च्या वापरामुळे यावर निश्चित तोडगा निघू शकतो. त्याचबरोबर दर्जेदार उत्पादनामुळे चांगला हमीभाव ही मिळू शकतो. या सुधारित नॉन वुवन स्कर्टींग कापडापासून तयार करण्यात येणाऱ्या बॅग्जचा वापर फ्रुट कव्हर म्हणून केला जातो, तर क्रॉप कव्हर म्हणून वापरले जाणारे उत्पादन हे रोल स्वरूपात उपलब्ध असते.
फ्रुट कव्हर (फळ कव्हर) चे फायदे – • दव, बर्फ, जंतू, पाऊस, वारा आणि पक्षांपासून फळांचे प्रभावी संरक्षण होते. • ताजी फळे आणि फुलांचे गुच्छ बांधण्यासाठी वापर करणे शक्य. • फळांचे काळ्या डागांपासून संरक्षण. • अपायकारक जंतूनाशकांचा वापर टाळणे शक्य. • नैसर्गिक आपत्ती तसेच वातावरणीय बदलांपासून फळांचे रक्षण. • फळांना एक प्रकारचे कवच मिळाल्याने उच्च दर्जाचे उत्पादन मिळते. • आपण या कव्हरचा वापर केळी, टरबूज, आंबा, लिची, पेरू, साईट्रस, पपई, द्राक्ष आणि इतर इत्यादी पिकामध्ये करू शकता. क्रॉप कव्हर (पीक कव्हर) चे फायदे – • पिकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक मायक्रोक्लायमेन्टची निर्मिती होते. • पीक लवकर तयार होते. • पिकांचे जीव जंतू आणि पक्षांपासून संरक्षण करते. • गारा, बर्फ, वारा तसेच पावसापासून पिकांचे संरक्षण करते. • रासायनिक खतांचा वापर मर्यादित होतो. • हवा, पाणी आणि गॅसचे चांगले प्रसरण होते. • या कव्हरचा वापर कोबी, गाजर, मुळा, फ्लॉवर, बटाटे, टोमॅटो, जिरे, टरबूज इत्यादी पिकामध्ये करू शकता. • संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
304
0