गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जैविक कीटकनाशकचे महत्व
शेतकरी कीटक व रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधारणपणे रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून असतात. कधीकधी, अनावश्यक कीटकांची लोकसंख्या आर्थिक पातळीपेक्षा कमी असते, तरी सुद्धा शेतकरी पिकांवर कीटकनाशकांचा वापर करतात. ज्यामुळे नैसर्गिक शत्रू व पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. पिकांवरील कीटक व रोगांच्या सुरूवातीच्या अवस्थेत जैविक कीटकनाशक वापरण्यावर भर दिला पाहिजे.
म्हणूनच आज काही कवक आधारीत जैव-कीटकनाशकांचा वापर व माहिती जाणून घेउयात. १. ट्रायकोडर्मा- हे बुरशीजन्य जैव-कीटकनाशके जमिनीत जन्मलेल्या हानीकारक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवू शकतात. जसे की, मूळकुज, खोडकुज इ. यामध्ये तीळ, मुग, उडीद ,खरबूज व इतर भाजीपाला यांचा समावेश आहे. २. बवेरिया बेसियाना – हे एक कवक आधारित जैविक कीटकनाशक लष्करी अळी, तुडतुडे ,पाने खाणाऱ्या अळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात तसेच पिकांचे नुकसान करणाऱ्या रसशोषक किडींवर नियंत्रणदेखील ठेवतात. ३. मेटारायझिम अॅनिस्पोल – हे जैविक कीटकनाशक वाळवी ,हुमणी ,थ्रीप्स, इत्यादी किडींवर नियंत्रण करतात तसेच मातीमधील किडींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानवरदेखील प्रभावी नियंत्रण ठेवतात. ४. सुडोमोनस फ्लोरोसन्स – हे जैविक कीटकनाशक पिकांवरील बुरशीजन्य रोग, काळी बुरशी व मातीमधील बुरशींवर प्रभावी नियंत्रण ठेवतात. ५. पॅसिलोमायसेस- हे जैविक कीटनाशक कांदा ,मिरची ,काकडी ,खरबूज ,कलिंगड ,भाजीपाला , डाळिंब आणि इत्यादी पिकांमधील सुत्रकृमीवर प्रभावी नियंत्रण करतात. ६. बॅसिलस थुरीन्जेसीस – याचा उपयोग पिकांचे नुकसान करणाऱ्या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला जातो. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
645
0
संबंधित लेख