AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Sep 19, 06:30 PM
पशुपालनकृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार
पोषक घटक वाढविण्यासाठी भुसा युरिया प्रक्रिया
परिचय: यूरियासह कोंडा किंवा भुसाची प्रक्रिया केल्याने, त्याचे पौष्टिक घटक आणि प्रथिनेंचे प्रमाण सुमारे ९% वाढते. यूरिया-प्रक्रिया केलेला चारा जनावरांना दिला गेला, तर पशुखाद्य आहारात नियमित आहारापेक्षा कमीतकमी ३०% पर्यंत कमी केला जाऊ शकतो.
प्रक्रिया: प्रक्रियासाठी ४ किलो युरिया ४० लिटर पाण्यात विरघळावा. साधारणतः एक क्विंटल भुसा, कोंडा जमिनीवर अशा प्रकारे पसरवा की, थराची जाडी सुमारे ३ ते ४ इंच होईल. तयार झालेले ४० लिटरचे द्रावण या पसरलेल्या थरावर शिंपडावे. त्यानंतर आपल्या पायांनी भुसा चांगला दाबून घ्यावा. या दाबलेल्या भागावर एक क्विंटल भुसा पुन्हा एकदा पसरवा, तसेच ४ किलो युरिया मिश्रित ४० लिटरचे द्रावण या पसरलेल्या थरावर शिंपडावे व चांगले दाबून घ्यावे. प्रत्येकी १०० किलो भुसाचे १० थर करून प्रत्येकवेळी द्रावणाची फवारणी करावी आणि थर दाबून घ्यावा. प्रक्रिया केलेला भुसा प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवा आणि जमिनीपासूनचा काही भुसाचा थर मातीने झाकावा. जेणेकरून नंतरच्या टप्प्यात तयार होणारा गॅस बाहेर फेकला जाणार नाही. एकावेळी कमीतकमी एक टन भुसा वापरला जावा. प्रक्रियेसाठी खाली थरासाठी फरशी असणे सर्वात योग्य आहे आणि बंद खोली सोयीस्कर राहते. उन्हाळ्याच्या २१ दिवसानंतर आणि हिवाळ्याच्या २६ दिवसांनंतर किंवा पावसाळ्यानंतर, भुसा पूर्णपणे झाकून टाकावा. जनावरांना खायला देण्यापूर्वी कमीत कमी १० मिनिटे भुसा उघडून ठेवावे. जेणेकरून गॅस कमी होईल तसेच सुरुवातीला, जनावरांना चारा कमी प्रमाणात द्यावा. संदर्भ: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
403
1