कृषि वार्ताकृषी जागरण
वैज्ञानिकांनी बनविले पालेभाज्या कापण्यासाठी ‘वेजबोट’
वैज्ञानिकांनी एक रोबोट विकसित केले आहे. जे मशीन लर्निंग (मशीन लर्निंग विधी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे एक अॅप्लिकेशन आहे, जे कोणत्याही सिस्टमला स्वत: चालविण्यास मदत करतो) चा उपयोग करून पिकाची ओळख आणि कापणी करतो. या तंत्रज्ञानाला ब्रिटनच्या कैब्रिज युनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांच्याद्वारे बनविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचे नाव त्यांनी वेजबोट ठेवले आहे. हे त्वरित लेटयूस या पालेभाजीला ओळखतो आणि याची कापणीदेखील करण्यास हे सक्षम आहे.
द जर्नल ऑफ फील्ड रोबोटिक्सव्दारा प्रकाशित केलेल्या एका लेखानुसार, स्थानिय फळ व भाजीपाला सहकारी समिती यांच्या सहकार्याने विविध परिस्थितीमध्ये याचे यशस्वीपूर्ण परिक्षण करण्यात आले आहे. ब्रिटेनच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, प्रोटोटाइप मशीन व्यतिरिक्त कोणाच्याही मदतीविना हे चालू शकत नाही. यासाठी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीची गरज असते. हे कृषी क्षेत्रामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये रोबोटिक्सची उपयोगिता वाढविण्यासाठी मदत करतात. या तंत्रज्ञानामुळे लोकांना मोठी मदत मिळणार आहे. त्याचबरोबर लोकांचा वेळ व पैसा दोन्ही ही वाचणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, ११ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
24
0
संबंधित लेख