AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Mar 20, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रappliedbionomics.com
ट्रायकोग्रामा परजीवी अंडीचे जीवन चक्र
 'ट्रायकोग्रामा' हे मित्र कीटक शेतात सोडले असता ५ मीटर व्यासाच्या क्षेत्रातील किडींनी घातलेल्या अंड्याचा शोध घेतात आणि खातात. हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात आणि त्या अंड्याचा आतला भाग खातात आणि मग कोषावस्थेत जातात. अशा प्रकारे ट्रायकोग्रामा ह आपला मित्र, शत्रू किडींचा नाश करतो त्यामुळे आपलं होणारं नुकसान टळलं जात.  यामध्ये ट्रायकोग्रामा चिलोनीस, ट्रायकोग्रामा जापोनिकम, ट्रायकोग्रामा एल्डानी या प्रजाती महत्त्वाच्या आहेत.
जीवनचक्र:- ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटकाचा जीवनक्रम अंडी (१ दिवस), अळी (३ ते ४ दिवस), कोष (४ ते ५ दिवस) व पौढ (६ ते ८ दिवस) अश्या चार अवस्थांचा असतो. म्हणजेच ट्रायगोग्रामाचे पूर्ण आयुष्य १५-२० दिवसांचे असते. फायदे:- • ट्रायकोग्रामा किडींच्या अंड्यावर उपजीविका करतो. त्यामुळे किडींचा अंडी अवस्थेतच नाश होतो. • ट्रायकोग्रामा स्वतःच अशा किडींच्या अंड्याचा शोध घेऊन त्याचा नाश करतो. • ३ – ४ वर्षे सातत्याने ट्रायकोग्रामा सोडल्यास त्या क्षेत्रात त्याची प्रचंड संख्या वाढते. त्यामुळे किडींचा नाष्टावा होतो. • ट्रायकोग्रामा वापरल्यान कीटकनाशकावर होणारा खर्च कमी होतो. • शेतात सोडण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि सहज शक्य आहे. • प्रदूषण विरहीत पर्यावरण सध्या होते. • ट्रायकोग्रामाचा इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही. • ट्रायकोग्रामा मानवाला आणि पाळीव प्राण्यांना अपायकारक नाही. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
31
6