जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ट्रायकोग्रामा-एक अंडी परोपजीवी मित्रकिटक
जैविक – कीड नियंत्रण प्रणाली हि एकात्मिक किड व्यवस्थापनातील महत्वाचा घटक असुन याचा वापर प्रभावी ठरत आहे. अनेक किडीच्या अंड्यावर उपजीविका करणारा आपला मित्र कीटक म्हणजे ‘ट्रायकोग्रामा चीलोनीस’ होय. ही प्रजाती विविध प्रकारच्या २०० किडींच्या अंड्यावर हा ट्रायकोग्रामा उपजीविका करतो. जिवनचक्र:- ट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६-२४ तास असुन त्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. अळी अवस्था २-३ दिवस असते. ही अळी किडीच्या अंड्यातील घटकांवर जगते. त्यामुळे त्यातून किडीची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्यानंतर अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था २-३ दिवस असते. ७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.कोशावस्थेतुन बाहेर पडलेला प्रौढ ट्रायकोग्रामा २४ – ४८ तास जगतो. प्रौढ पुढे २ ते ३ दिवस शेतात फिरुन अळीवर्गीय किडीच्या अंड्यांचा शोध घेऊन, त्यात आपली अंडी घालतो. अशा पद्धतीने ट्रायकोग्रामा किडीचे जिवनचक्र पुर्ण होते. ट्रायकोग्रामा कीडनियंत्रण कार्य पध्दती ट्रायकोग्रामा हे मित्र कीटकांचे प्रयोगशाळेत उत्पादन घेतले जाते. प्रयोगशाळेत कॉर्सेरा च्या अंड्य़ावर कृत्रिम रित्या ट्रायकोग्रामाच्या मादीकडुन अंडी घालुन अशा प्रकारे तयार केलेले कार्ड शेतक-यांना वितरीत केले जातात. अशा कार्डवर सुमारे १८ ते २० हजार अंडी असतात. या कार्ड च्या पट्ट्या करुन शेतात पिकाच्या कॅनोपी मध्ये पिकाच्या पानास स्टेपलर ने किंवा दो-याने बांधुन लावता येतात. हे परोपजीवी ट्रायकोग्रामा शेतात सोडले असता ५ मीटर व्यासाच्या क्षेत्रातील किडींनी घातलेल्या अंड्याचा शोध घेउन त्यावर मादी कीटक अंडी घालते. एक मादी हानिकारक किडींची अंडी शोधून १ अंड्यात सुमारे २ ते ६ अंडी घालतात. ट्रायकोग्रामाची अंडी उबवल्यानंतर अळी अवस्था हानिकारक किडीच्या अंड्यातील आतला भाग खातात आणि मग कोषावस्थेत जातात. या संपुर्ण प्रक्रियेमध्ये हानिकारक किडीच्या अंड्य़ातील जिवंत भाग संपवला जातो तसेच अशा अंड्यातुन जिवंत किटक बाहेर पडत नाही.अशा प्रकारे ट्रायकोग्रामा ह आपला मित्र, शत्रू किडींचा नाश करतो त्यामुळे आपलं होणारं नुकसान टळलं जात. ट्रायकोकार्डसचा वापर:- कार्डवर काळी अंडी दिसली, कि त्यातल्या ट्रायकोग्रामाची पूर्ण वाढ झाली असं समजावं. कार्ड घेतल्यांनतर साधारण परिस्थीती मध्ये फक्त दोन दिवसाच्या आत शेतात वापरणं जरुरीचं आहे. वेळेत कार्डस शेतात लावले नाही तर अंड्यातून प्रौढ ट्रायकोग्रामा निघून तो मारण्याची शक्यता असते. सकाळी अगर सायंकाळी ट्रायकोग्रामा शेतात सोडवा. एका कार्डच्या कात्रीने सहा पट्ट्या कराव्यात. या ट्रायकोकार्डसच्या पट्ट्या पानांच्या पाठीमागे टाचणीने अगर स्टेपलरने टोचाव्यात. प्रत्येक ट्रायकोकार्डच्या पट्ट्टी मध्ये साधारणपने ८ – १० मीटर अंतर ठेवावे. शेतात ट्रायकोग्रामा सोडल्यानंतर हानिकारक किटकनाशकांची फ़वारनी करु नये. पिकास पाणी दिल्यानंतर तयार होणा-या आर्द्रतेमुळे ट्रायकोग्राम सोडल्या नंतर किड नियंत्रणात जास्त फ़ायदा दिसुन येतो. उसावरची खोडकिड, कांडीकीड, कपाशी वरची बोंडअळी, भाजीपाल्यावरील फळ आणि खोड पोखरणाऱ्या अळ्या, सुर्याफुलांवरील पाने खाणारी आळी, भातावरील खोडकिडी इत्यादी किडींवर ट्रायकोग्रामा चांगल्या प्रकारे कार्य करुन किड नियंत्रण प्रभावी पने करतो. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
520
1
संबंधित लेख