सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेती,फळ बागेमधील कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी पर्यावरण पूरक सापळा पिके
सापळा पिके ही मुख्य पिकाच्या शेतीभोवती लागवड करून कीटकांना मुख्य पिकांवरून सापळा पिकांकडे आकर्षित केले जाते.सापळा पिके ही अधिक उत्पादनाच्या हेतूने लागवड केली जात नाहीत.मादी कीड हे मुख्य पिकांच्या तुलनेत सापळा पिकांवर अंडी घालण्यास प्राधान्य देतात.त्यामुळे किडींची संख्या कमी होण्यास मदत होते. सापळा पिके- • कोबी पिकांभोवती मोहरीचे पीक हे सापाळा पीक म्हणून लावल्यास डायमंड बॅक मॉथ ही कीड कोबीच्या तुलनेत मोहरी पिकावर अंडी घालते. त्यामुळे कोबी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात राहतो. • कपाशी व टोमॅटो पिकामध्ये प्रत्येक १० ओळीनंतर झेंडूची लागवड करावी. त्यामुळे बोंड अळी व फळ पोखरणारी अळी ही झेंडूच्या पिकांवर अंडी घालण्यास प्राधान्य देते बहरमध्ये झेंडू ची फुले वेळच्या वेळी तोडावीत. • कपाशी भुईमुगची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतीभोवती एरंडी ची लागवड करावी.त्यावरील प्रादुर्भाव झालेली पानेवेळच्या वेळी गोळा करून नष्ट करावीत.तसेच टोमॅटो शेतीभोवती नागअळीच्या नियंत्रणासाठी झेंडूची पिकाची लागवड करावी. • संत्रामध्ये नागअळीच्या नियंत्रणासाठी टोमॅटो पिकाची बागेभोवती लागवड करावी. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. • मक्याच्या शेतीभोवती सापळा पीक म्हणून नेपिअर गवताची लागवड केल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. • केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी भुईमूग, सोयाबीन , चवळी पिकाच्या शेतीभोवती अंबाडा पिकाची सापळा पीक म्हणून लागवड करावी. • कोबी पिकामधील फ्लिआ बीटलच्या नियंत्रणासाठी सापळा पीक म्हणून गाजर पिकाची लागवड करावी. महत्वाचे मुद्दे – • मुख्य पिकाबरोबरच सापळा पिकांची लागवड करावी. • सापळा पिकांवर रासायनिक कीटकनाशकची फवारणी करू नये. • सापळा पिकांचे देखभाल करण्यासाठी योग्य कृषी पद्धतीचा वापर करावा. संदर्भ - अॅग्रोस्टार ऍग्रोनॉमि सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स
205
0
संबंधित लेख