मान्सून समाचारपुढारी
विदर्भात मुसळधार; इतरत्र हलका पाऊस पडेल
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र घाटमाथ्यावर आज पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दर्शविला आहे. गुजरात येथील कच्छच्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या भागांमधील पावसाचा जोर अचानक वाढू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही दिला गेला. उर्वरित राज्यात मात्र काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असे सांगण्यात आले.
गेल्या 24 तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. संदर्भ – पुढारी, 30 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
38
0
संबंधित लेख