AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कांदे व बटाटेसह टोमॅटोचे उत्पादन वाढणार
पीक हंगाम २०१९-२० मध्ये कांदा व बटाटासह टोमॅटोचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या प्राथमिक अंदाजानुसार बागायती पिकांचे उत्पादन ०.८४ टक्क्यांची वाढ होऊन रेकॉर्ड ३१.३३ करोड टन होण्याचा अंदाज आहे.
शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी बागायती पिकांच्या पेरणीला प्राधान्य देत आहेत, म्हणूनच दरवर्षी बागायती पिकांच्या पेरणीत वाढ होत आहे. मंत्रालयाच्या मते, २०१९-२० या पीक हंगामात बागायती पिकांची पेरणी २५६.१ लाख हेक्टरमध्ये झाली आहे, जी मागील वर्षीच्या २५४.३ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, पीक हंगाम २०१९-२० मध्ये कांदयाचे उत्पादन ७.१७ टक्क्यांची वाढ होऊन २४४.५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे की मागील वर्षी २२८.२ लाख टन उत्पादन झाले होते. या तुलनेत बटाट्याचे उत्पादन ३.४९ टक्क्यांची वाढ होऊन ५१९.४ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे की पीक हंगाम २०१८-१९ मध्ये ५१०.९ लाख टन उत्पादन झाले होते. टोमॅटोचे उत्पादन या दरम्यान १.६८ टक्क्यांची वाढ होऊन १९३.३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे की मागील वर्षी १९०.१ लाख टन उत्पादन झाले होते. संदर्भ - आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २७ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
62
13