सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटोवरील टूटा ( टूटा अब्सुलुटा) किडीचे लक्षणे व व्यवस्थापन
टूटा अब्सुलुटा हा किडीचा प्रादुर्भाव टोमॅटोवर होतो. या वर्गातील बटाटा पिकांवरदेखील या किडीचा जीवनक्रम तयार होत असतो. टोमॅटो पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो.
किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे • कीडग्रस्त झालेल्या टोमॅटोमधील पानाच्या भागावर अनियमित रेषा तयार होतात. • लार्वाचा टोमॅटोमधील शेंडा व खोडावर प्रादुर्भाव होतो तसेच लाल व हिरव्या टोमॅटोवरदेखील या किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव झालेल्या टोमॅटोवर लहान छिद्र दिसतात. • कोषामधील कीड हे माती किंवा वनस्पतीच्या पानावर व खोडावर आढळते. व्यवस्थापन – • प्रादुर्भावग्रस्त टोमॅटोची झाडे व फळे एकत्रित गोळा करून नष्ट करावेत. • शेतीमध्ये टोमॅटोच्या पीक काढणीनंतर त्याच वर्गातील भाजीपाला पिके घेणे टाळावीत. • टोमॅटो लागवडीसाठी नेहमी निरोगी रोपे वापरावी. प्रति एकरी १६ कामगंध सापळे पिकापेक्षा जास्त उंचीवर लावावेत.जेणेकरून सापळ्याकडे प्रौढ कीड आकर्षित होतात. त्यांना गोळा करून नष्ट करावेत. • क्लोरंट्रानिलिप्रोल १८.५% एस सी @६० मिली किंवा सायनट्रिनीलीप्रोल १०.२६% ओडी @६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २०% डब्लू जी @ ६० gm किंवा निमअर्क ५% @ ४००-६०० मिली प्रति एकर फवारणी करावी. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
485
1
संबंधित लेख