कृषि वार्ताअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पाहा, आज ‘जागतिक हवामान दिन’
‘हा’ दिवस का साजरा केला जातो? आज २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सुर्य, पृथ्वी व हवामान ही संकल्पना आहे. लोकांची सुरक्षितता, अन्नसुरक्षितता, पाण्याचे स्त्रोत व वाहतूक व्यवस्था या लोकहितार्थ दृष्टीने काम करण्याची ही संकल्पना आहे.
सन १९६१ पासून जागतिक हवामान संघटनेने हा दिवस हवामान दिन म्हणून जगभर साजरा करण्याचे ठरविले आहे. हवामानबद्दल जगातील नागरिकांमध्ये जागृती व्हावी, हा यामागचा हेतू आहे. २३ मार्च १९५० या दिवशी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली, म्हणून २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. संदर्भ - जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ.रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
64
0
संबंधित लेख