पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी महत्वाच्या बाबी
पशुपालकांसाठी स्वत:ची जनावरे ही खरी संपत्ती असल्यासारखी आहेत. दुधावरील जनावरे व वासरे निरोगी असतील, तरच सध्या व भविष्यात नफा मिळू शकेल. हा नफा मिळविणे पशुपालकांच्या हातात आहे. चला तर मग यासाठी काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊया.
ताजे आणि स्वच्छ पाणी:- जनावरांच्या आहारातील हा एक महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक आहे. आरोग्य, शरीराचे तापमान आणि अन्नाचे पचन होणे हे सर्व घटक दुध उत्पादनासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. प्रौढ जनावरांना प्रति दिवसाला ३५ ते ७० लिटर पाणी पाजणे गरजेचे आहे. संतुलित आहार:- सर्व जनावरांच्या चारा खाण्याच्या काही मर्यादा असतात. जनावरे ही त्यांच्या शरीराच्या वजनाच्या अनुसार २५% कोरडे चारा तर १०% पर्यंत हिरवा चारा खाऊ शकतात. जर जनावरास कमी प्रमाणात खाद्य दिले गेले तर जनावर उपाशी राहून त्याचा दुष्परिणाम होतो. यामध्ये त्यांची वाढ कमी होते, गाभण अवस्थेत उशीर होतो आणि पौष्टिकतेचा अभाव झाल्यास रोगांची लागण लवकर होते. हे रोखण्यासाठी सर्व जनावरांना हिरवे गवत आणि आवश्यक concentrated feed दिल्यास जनावरे निरोगी राहिल आणि त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल. प्रौढ जनावरे ९-१० किलो कोरडा आणि ३५-४५ किलो हिरवा गवत खाऊ शकतात. यापेक्षा जास्त गवत दिल्यास गवत वाया जाऊ शकते. दुधावरील जनावरांना त्यांच्या दुधाच्या प्रमाणानुसार ५०% concentrated feed देण्याची शिफारस केली जाते. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!
212
0
संबंधित लेख