मान्सून समाचारअॅग्रोवन
राज्यात ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा
पुणे – अरबी समुद्रातील क्यार वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघदीप दिली आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणात बदल होत, ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळी व रात्री उशिरा या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजा व गारांसह पाऊस पडत आहे. आज 30 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडयात काही ठिकाणी, तर कोकण, विदर्भात तुरळक मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 30 ऑक्टोबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
0
संबंधित लेख