कृषी वार्ताकृषी जागरण
पाहा, कोणत्या राज्यांना मिळाला ‘जैविक इंडिया पुरस्कार’
जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी व अधिक शेतकऱ्यांना या शेतीकडे वळावे या हेतूने दिल्लीमधील एका कार्यक्रमात व्यापार व उदयोगमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते नुकतेच ‘जैविक इंडिया पुरस्कार’चे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तीन राज्यांना पुरस्कार दिले गेले आहे, यामध्ये प्रथम क्रमांक मणिपुर या राज्याने प्राप्त केला असून व्दितीय पंजाब व तृतीय क्रमांक उत्तराखंड या राज्यांने पटकविला आहे. उत्तराखंड या राज्याला जैविक शेतीसाठी उत्तम कार्य केल्याबद्दल दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला असून या राज्यात तीन लाख शेतकरी १.५ लाख हेक्टर जमिनीवर जैविक शेती करतात, तर पंजाबची निवड पंजाब अॅग्रीच्यावतीने जैविक शेतीला उच्च स्तरावर पोहोचविणे व या शेतीविषयी जागृत करण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे.
पंजाब शासनची एजन्सी पंजाब अॅग्री एक्सपोर्ट कार्पोरेशनच्यावतीने भारत शासनाच्या विविध योजने अंतर्गत जैविक शेतीशी संबंधित संस्थाच्या साहाय्याने हा आॅर्गेनिक कार्यक्रम आयोजित करतात. पंजाब अॅग्रीच्यावतीने शेतकऱ्यांना पिकांबाबत पूर्ण मदत केली जाते. या मदतीच्या माध्यमातून जैविक शेतीशी संबंधित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य किंमतीत जैविक गहू, मक्का,बासमती व इतर पिकांची खरेदी केली जाते, तसेच भारत व अन्य देशात यांच्या विक्रीसाठी प्रमाणीकरण केले जाते. जैविक शेतीसाठी केंद्र शासनाने १५०० करोड रू. योजनेला ही मंजूरी दिली असून,यामध्ये १० हजार जैविक समूह बनविण्यासाठी कार्य सुरू झाले आहे. _x000D_ संदर्भ - कृषी जागरण, ४ जानेवारी २०१९
41
0
संबंधित लेख