मान्सून समाचारपुढारी
मध्य महाराष्ट्रात पावसाची ही स्थिती आणखी तीन दिवस
पुणे: कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात आणखी चार दिवस जोरदार पाऊस राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई परिसरात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड जिल्हयात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्हयातील घाट विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात मात्र अजून काही ठिकाणी हलका पाऊस होत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात सोमवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा असून 6 ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 6, 7 व 8 ऑगस्टला काही ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून पुढील चार दिवस अनेक ठिकाणी पाऊस राहील. यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. मराठवाडयात सोमवारी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून पुढील दोन दिवस सर्वदूर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात सोमवारी सर्वदूर हलका पाऊस होईल. सध्या सुरू असलेला पाऊस 8 ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे. संदर्भ – लोकमत, 5 ऑगस्ट 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
53
0
संबंधित लेख